पाकिस्तानचा चीनवर मोठा आरोप
इस्लामाबाद (पाकिस्तान) – ऑपरेशन सिंदूरच्या वेळी चीनने पाकला दिलेल्या हवाई संरक्षण यंत्रणा, तसेच क्षेपणास्त्रे भारताने उद्ध्वस्त केली. चीनने स्पष्टीकरण दिले की, ‘ब्राह्मोस सारखी कमी उंचीवरून उडणारी क्षेपणास्त्रे आमच्या यंत्रणेच्या कक्षेच्या बाहेर आहेत.’ यावर पाकच्या अधिकार्यांनी आरोप केला आहे की, या यंत्रणेच्या क्षमतेबद्दल चीनने आधी माहिती दिली नव्हती. चीनकडून आपली फसवणूक झाली. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला पराभव झाला.
‘पाकिस्तानमध्ये चीनने दिलेल्या ‘एच्क्यू-९बी’ आणि ‘एच्क्यू-१६’ या हवाई संरक्षण यंत्रणांवरून मोठा असंतोष आहे’, असे चीनच्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ‘या यंत्रणांची रचना भारताच्या ‘ब्राह्मोस’सारख्या क्षेपणास्त्रांना शोधण्यासाठी बनवण्यात आलेली नाही’, असे चीनने मान्य केल्यानंतर पाकिस्तानमध्ये चीनविरोधात अजून नाराजी दिसून आली आहे.
पाकिस्तान आता पर्यायांवर विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आता तुर्कीयेच्या हवाई संरक्षण यंत्रणांचा विचार करत आहे.

Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !