पाकिस्तानकडून चालू असलेल्या अपप्रचार मोहिमेत ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा माहिती युद्धातील मोलाचा वाटा !

पुणे – राष्ट्रहितासाठी केलेले कोणतेही कार्य लहान नसते. तुम्ही ज्या संयमाने आणि अभ्यासपूर्वक खोट्या माहितीविरुद्ध भारतीय जनतेसमोर सत्य मांडले, त्यातून देशवासियांमध्ये आत्मविश्वास आणि जागरूकता निर्माण झाली, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान राष्ट्रहितासाठी केलेल्या योगदानाविषयी भारतीय लष्करातील ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा विनोद तावडे यांनी पत्राद्वारे गौरव केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून चालू असलेल्या अपप्रचार मोहिमेला रोखण्यासाठी ब्रिगेडियर महाजन यांनी केलेले ‘फॅक्ट चेकिंग’, विश्लेषण आणि सत्यनिष्ठ मांडणी यांचे विनोद तावडे यांनी पत्रातून विशेष कौतुक केले आहे.
‘‘सीमेवर भारतीय सेनेचे शौर्य जितके वंदनीय, तितकेच तुमचे माहिती क्षेत्रातील योगदानही महत्त्वाचे आहे’’, असा गौरवपूर्ण उल्लेखही पत्रात केला आहे.
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !