
धुळे येथे २० लाखांचे बनावट बियाणे जप्त
धुळे – कृषी विभागाच्या अधिकार्यांनी येथे कर्णावती (अहमदाबाद) गुजरात येथून आलेली २० लाखांहून अधिक किमतीचे बियाणे जप्त केले. यांतील २०० बियाणांची पाकिटे विजय ट्रॅव्हल्समधून आणि अन्य १ सहस्र २०० पाकिटे अन्य एका ट्रॅव्हल्समधून येत होती. कृषी अधिकार्यांनी वेषांतर करून हे बनावट बियाणे पकडले आहेत. त्यांनी नागपूर, अकोला, बुलढाणा येथे जाणार्या सर्व गाड्या तपासल्या.
‘लाडकी बहीण योजने’चा हप्ता वटपौर्णिमेला !

मुंबई – ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे मे आणि जून या महिन्यांचे पैसे एकदम १० जून या दिवशी वटपौर्णिमेला मिळणार असल्याची चर्चा आहे. कुठल्या तरी विशेष सणाच्या दिवशीचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा केले जातात.
२४ घंट्यात २१ नवीन कोरोना रुग्ण !

मुंबई – राज्यात गेल्या २४ घंट्यांत २१ नवीन रुग्णांची वाढ झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळनंतर रुग्णांमध्ये वाढ होण्यात महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना महामारीमुळे एकूण ७ जण गेले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता एकूण ५०६ झाली आहे.
लॉरेन्स बिष्णोई गटाच्या गुंडाला अटक

यवतमाळ – लॉरेन्स बिष्णोई गटाचा पोलिसांना हवा असणार्या एका गुंडाला यवतमाळमधून अटक करण्यात आली आहे. गेली २ वर्षे तो यवतमाळमध्ये होता. भूपेंद्र सिंह असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर पंजाबमध्ये १५, तर राजस्थानमध्ये १ गुन्हा नोंद आहे. त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही लावण्यात आले होते.
मंत्रालयात तंबाखूमुक्तीची शपथ

मुंबई – ३१ मे या दिवशी जागतिक तंबाखू विरोधीदिन होता. त्या निमित्ताने मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य मंत्रालय सचिव डॉ. निपुण विनायक यांनी अधिकारी, कर्मचारी आणि मुंबईकर यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, ज्यांने वर्ष २०११ मध्ये व्यसनमुक्तीचे धोरण बनवले आहे.
येत्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्या १०० मीटरपासून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी, तसेच नशाबंदी मंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत या ठिकाणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकातंबाखूयुक्त पदार्थ विकणारे आणि तंबाखू खाऊन थुंकणारे यांच्यावर कठोर कारवाई हवी ! |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव