
पुणे – सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ घंट्यांत राज्यात कोरोनाचे ६५ रुग्ण आढळले आहेत. त्यात पुणे महापालिका २५, मुंबई २२, ठाणे महापालिका ९, पिंपरी-चिंचवड महापालिका ६, कोल्हापूर महापालिका २ आणि नागपूर महापालिका १ असे रुग्ण आहेत. राज्यात १ जानेवारी ते १ जून २०२५ पर्यंत ११ सहस्र ५०१ संशयित कोरोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८१४ जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. मुंबईत सर्वाधिक ४६३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना सक्रीय रुग्ण संख्या ५०६ असून ३०० रुग्ण बरे झाले आहेत.
जानेवारीपासून आतापर्यंत मृत्यू झालेले कोरोनाचे ८ रुग्ण हे सहव्याधीग्रस्त होते. राज्यात कोरोना ८ रुग्णांमध्ये तुरळक वाढ दिसून येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !