|

सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज (तालुका जत) शाखेत शाखाधिकारी आणि शिपाई यांच्याकडून शासकीय निधीतील अनुमाने ५० लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन या शाखेतील कर्मचार्यांची बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून चौकशी चालू करण्यात आली आहे. चौकशीअंती अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाज येथील शासनाकडून शेतकर्यांसाठी आलेल्या अनुदानीत अनुमाने ५० लाख रुपये तत्कालीन शाखाधिकार्यांनी बँकेच्या खात्यावरून स्वतः आणि इतर नातेवाइकांच्या नावावर रकमेचा अपहार केल्याचा प्रकार बँकेच्या पडताळणीत निदर्शनास आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांचे पथक जत तालुक्यात तळ ठोकून आहे. त्यांनी बाज शाखेतील व्यवहारांची दिवसभर पडताळणी केली. अपहाराच्या प्रकरणातील नियुक्तीस असलेल्या डफळापूर शाखेचीही पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित करू ! – शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी‘‘जिल्हा बँकेच्या बाज शाखेत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेने चौकशी चालू केली आहे. चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित होईल. त्यानंतर तात्काळ कारवाई केली जाईल’’, असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले. |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !