चित्रफीत प्रसारित, दांपत्याविरोधात गुन्हा नोंद
पुणे – आंबेगाव परिसरात असलेल्या ऐतिहासिक शिवसृष्टी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर अमोल अरुण कुलकर्णी याने लघुशंका केली. या प्रकाराची चित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अमोल कुलकर्णी आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी नयनाथ अमराळे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी कुलकर्णी पती-पत्नी यांना चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणले.
नयनाथ अमराळे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पहाटेच्या सुमारास मित्रांसह नवले पुलावरून परत असतांना शिवसृष्टीच्या प्रवेशद्वाराजवळ २ चारचाकी गाड्या उभ्या दिसल्या. त्यापैकी एका गाडीजवळ एक पुरुष प्रवेशद्वाराजवळील फलकावर लघुशंका करतांना दिसला. त्याच्यासोबत एक महिलाही होती. आम्ही त्याला नाव विचारले असता, त्याने दोघांचे नाव सांगून ‘तुला काय करायचे ते कर’, असे अरेरावीचे उत्तर दिले. अशा प्रकारच्या समाजकंटकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी शिवभक्तांची मागणी आहे. या प्रकारामुळे लोकांच्या, शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. ही चित्रफीत समोर आल्यानंतर विविध संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आंदोलन करण्याची चेतावणीही दिली आहे.
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण