श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या अध्यक्षांना पुरस्कार प्रदान !
शनीशिंगणापुरात ‘शनीरत्न पुरस्कारा’ चे वितरण

शनीशिंगणापूर – ‘शनीरत्न पुरस्कार’ मी पुरस्कार म्हणून नव्हे, तर शनीदेवाचा आशीर्वाद म्हणून स्वीकारला आहे. लक्षावधी विठ्ठलभक्तांचा सेवेकरी म्हणून काम करण्यात आत्मिक समाधान आहे, असे मनोगत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले. शनीशिंगणापूर येथील ‘शनैश्वर देवस्थान ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष बाबुराव बानकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात येणारा २१ वा ‘शनीरत्न’ पुरस्कार औसेकर महाराज यांना प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी हे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आदर्शगाव समिती’चे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार होते. या प्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन औसेकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज प्रवीण महाराज गोसावी, कारभारी महाराज झरेकर, ‘संत ज्ञानेश्वर संस्थान’चे विश्वस्त विश्वासराव गडाख, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांसह अन्य उपस्थित होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !