
पुणे – संसदेत उल्लेखनीय योगदान देणार्या १७ खासदार आणि २ संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आली आहे. १७ पैकी ७ पुरस्कार महाराष्ट्रातील खासदारांना घोषित झाले आहेत. महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी विशेष पुरस्कार घोषित झाला, तर ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत, पहिल्यांदाच संसदेत लोकसभेवर निवडून आलेल्या स्मिता वाघ, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, पहिल्यांदा राज्यसभेवर आलेल्या भाजपच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी या ५ खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी माझी निवड करून कार्याची पोचपावती आणि प्रोत्साहन दिल्याविषयी मी निवड समितीचे आभार व्यक्त करते. माझ्यावर विश्वास दाखवून राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, यासाठी मी आभारी आहे, असे प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !