सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १८ मे (वार्ता.) – हिंदुत्व आणि राष्ट्रहित यांसाठी कार्य करून इतर हिंदूंपुढे आदर्श निर्माण करणार्या ४ जणांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते ‘हिंदु राष्ट्र रत्न’, तर १८ जणांचा ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
‘हिंदु राष्ट्र रत्न’ पुरस्काराचे सन्मानार्थी
१. पू. अधिवक्ता रवींद्र घोष, संस्थापक, बांगलादेश मायनॉरिटी वॉच, बांगलादेश
२. पू. काशीनाथ कवटेकर, पंचशिल्पकार, कर्नाटक
३. डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रख्यात प्रवचनकार, महाराष्ट्र
४. श्री गणेशशास्त्री द्रविड
‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराचे सन्मानार्थी
१. टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार, तेलंगाणा
२. श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना
३. श्री. अर्जुन संपथ, संस्थापक, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)
४. श्री. उदय माहुरकर, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन, देहली
५. अधिवक्ता अरुण श्यामजी, माजी अतिरिक्त महाअधिवक्ता, कर्नाटक
६. अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय
७. डॉ. कोनराल्ड एल्स्ट, हिंदुत्वनिष्ठ लेखक, बेल्जियम
८. श्री. अनिलकुमार धीर, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, ओडिशा
९. श्री. संजीव नेवर, संस्थापक, अग्नि समाज, देहली
१०. श्री. राहुल दिवाण, संस्थापक, ‘सरयु ट्रस्ट’, देहली
११. श्री. नीरज अत्री, लेखक आणि विचारवंत, देहली
१२. डॉ. सुरेश चव्हाणके, प्रमुख संपादक, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी
१३. रस आचार्य पू. धर्मयशजी महाराज, संस्थापक, धर्मस्थापनम फाऊंडेशन आणि परमधाम आश्रम, इंडोनेशिया
१४. प्रतापसिंग जुदेव, भाजप, छत्तीसगड
१५.घनपाठी आचार्य योगेश्वर बोरकर, गोवा
१६. कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त), संस्थापक, प्राच्यम्
१७. श्री. चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक अध्यक्ष, युवा ब्रिगेड, कर्नाटक
‘हिंदु राष्ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देण्यामागील उद्देश !हे पुरस्कार प्रदान करण्यामागील उद्देश सांगतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘देशात विविध क्षेत्रांत कार्य करणार्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, तसेच भारतरत्न आदी विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले जाते; मात्र हिंदु धर्मजागृती आणि धर्मरक्षण करणार्यांना कोणताच पुरस्कार दिला जात नाही. आज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हिंदु धर्मविरांना ‘हिंदु राष्ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक वर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त असे पुरस्कार दिले जातील. |