
देशभक्तीपर गीतांमुळे परिसर देशभक्तीमय
छत्रपती संभाजीनगर – पहलगाम येथे २२ एप्रिल या दिवशी अतिरेकी आक्रमण करण्यात आले होते. याचे चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावून पाकिस्तानातील आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकड्यांची सुरक्षाव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानने केलेले आक्रमण परतवून लावले. पाकिस्तानला नामोहरम केल्याविषयी क्रांती चौक येथे १२ मे या दिवशी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने क्रांती चौक येथे कृतज्ञता कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी देशसेवेमध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी सर्व जाती-पाती, धर्म, राजकीय पक्ष बाजूला ठेवून भारतीय सैनिकांच्या प्रति सर्वजण ऋण व्यक्त करण्यासाठी एकत्र आले होते. देशभक्तीपर गीतांमुळे परिसर देशभक्तीमय झाला होता. या वेळी तरुण युवक युवती, माता भगिनी, नागरिक हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भारतमाता की जय, वन्दे मातरम्’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !