
नवी देहली – भारताने पाकिस्तानसमवेतची आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानचे कोणतेही साहित्य भारतात येणार नाही. पाकिस्तानमध्ये सिद्ध झालेल्या किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणतीही वस्तू भारतात येणार नाही. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे की, जर आयातीची आवश्यकता भासत असेल, तर त्यासाठी भारत सरकारची विशेष मान्यता घेणे आवश्यक असेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये व्यापारी संबंध मर्यादित आहेत; परंतु दोन्ही देश एकमेकांना काही वस्तूंची आयात-निर्यात करतात. पाकिस्तान भारताला सुकामेवा, टरबूज, सिमेंट, सैंधव मीठ निर्यात करतो, तर भारताकडून दगड, चुनखडी, चष्म्यासाठी ऑप्टिकल वस्तू, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने, धातू संयुगे आणि चामड्याच्या वस्तू आयात करतो.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !