काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून पुणे शहराचा अपमान !

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात खटला चालू आहे. राहुल गांधी यांनी न्यायालयात स्वतः उपस्थित रहाण्यापासून कायमस्वरूपी सवलत मिळावी, असा अर्ज न्यायालयात प्रविष्ट केला होता. या अर्जात पुणे येथे खटल्यासाठी उपस्थित न रहाण्यासाठी संतापजनक कारणे दिली आहेत. ते म्हणाले, ‘‘पुणे न्यायालयाची जागा सुरक्षित नाही, ती धोकादायक आहे. या न्यायालयाच्या परिसरात बाँबस्फोट करण्याच्या धमक्याही यापूर्वी आल्या होत्या. वीर सावरकर हे महात्मा गांधी खटल्यात सहआरोपी होते, त्या खटल्यात नथुराम गोडसे हेही सहआरोपी होते. नथुराम गोडसे हे पुण्याचे होते. या खटल्याचाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंध आहे. त्यामुळे मी पुणे न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही.’’
पुण्याच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा पुणेकरांच्या भावना दुखावण्याचा प्रकार !
|