खड्डेमुक्‍तीसाठी कोल्‍हापूर बसस्‍थानकात ‘पेव्‍हिंग ब्‍लॉक’ बसवण्‍याचे काम चालू !

कोल्‍हापूर बसस्‍थानकात चालू असलेले ‘पेव्‍हिंग ब्‍लॉक’ बसवण्‍याचे काम

कोल्‍हापूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्‍हापूर बसस्‍थानकात अनेक खड्डे असून त्‍यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता, तसेच धूळही मोठ्या प्रमाणात होती. येथील बसस्‍थानककाचे संपूर्ण सिंमेटीकरण करण्‍याचा प्रस्‍ताव संमत होईपर्यंत तेथे ‘पेव्‍हिंग ब्‍लॉक’ बसवण्‍याचे काम चालू केले आहे. त्‍यासाठी १६ लाख १३ सहस्र ८१९ रुपयांची निविदा काढण्‍यात आलेली आहे. हे काम खासगी ठेकेदार करत आहे. दिवसभर गाड्यांची ये-जा असल्याने रात्री काम केले जाते. कामाचा कालावधी २ महिन्यांचा असला, तरी लवकरच काम पूर्ण करण्यात येईल, असे एस्.टी. प्रशासनाने सांगितले.

कोल्‍हापूर बसस्‍थानकात चालू असलेले ‘पेव्‍हिंग ब्‍लॉक’ बसवण्‍याचे काम