तीनदा ‘तलाक’ म्‍हणून दुसरा विवाह करू पहाणार्‍या धर्मांधावर गुन्‍हा नोंद !

महाड (रायगड) येथील घटना !

प्रतिकात्मक चित्र

महाड (रायगड) – पहिली पत्नी असतांना केवळ ३ वेळा ‘तलाक’ म्‍हणून दुसर्‍या लग्‍नाची सिद्धता करणारा अब्‍दुल रहमान इसा याच्‍या विरोधात महाड पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. त्याची पत्नी नैना हिने पती आणि सासरची मंडळी यांच्याकडून शारीरिक अन् मानसिक छळ होत असल्याची तक्रार केली होती. तक्रारीनंतर अब्दुलसह चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. लग्नानंतर परदेशात व्यवसायासाठी १ कोटी रुपये लागणार असल्याने पत्नीकडे तिच्या वडिलांचे घर नावावर करण्याची मागणी केली. तिने विरोध केल्यावर अब्दुलने दुसर्‍या लग्नाचा निर्णय घेतला.

संपादकीय भूमिका :

भारतात ‘तिहेरी तलाक’वर बंदी असतांना कायद्याचे उल्लंघन करू पहाणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाईच व्‍हायला हवी !