कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे राज्यमंत्री मंकल वैद्य यांचे विधान
बेंगळुरू (कर्नाटक) – गायींच्या चोरीच्या वाढत्या घटनांवर आरोपींना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिला जाईल, असे विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री मंकल वैद्य यांनी केले आहे. उत्तर कन्नडमध्ये गायींच्या चोर्या होण्याच्या वाढत्या घटनांवर ते बोलत होते.
मंकल वैद्य म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत गायींची चोरी होऊ नये. मी पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. मग ते कुणीही असोत. जर अशा घटना पुन्हा घडल्या, तर मी गुन्हेगारांना जागीच गोळ्या घालण्याचे आदेश देईन. (घडल्यावर करण्यापेक्षा आधीच असे केले, तर पुन्हा अशा घटनाच घडणार नाहीत, हे मंत्र्यांच्या का लक्षात येत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकाँग्रेस सरकारच्या काळात गायींच्या चोर्याही होतात आणि हत्याही होतात, तरीही सरकारमधील मंत्री गुन्हेगारांवर गोळ्या झाडण्यासाठी आदेश देण्यावर अद्यापही विचार करत आहेत. दुसरीकडे उत्तरप्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार गोतस्करांना गोळ्या झाडून त्यांना अपंग बनवत आहे ! |