प्रयागराज – महाकुंभपर्वासाठी वेगवेगळ्या राज्यांतून प्रतिदिन कोट्यवधी भाविक येत आहेत. प्रयागराज येथे आल्यानंतर १५ ते २० लाख भाविक प्रतिदिन काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी वारासणी येथे, तर रामललांच्या दर्शनासाठी अयोध्या येथे जात आहेत. दोन्ही शहरात वाढलेली गर्दी सांभाळणे पोलीस आणि प्रशासन यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. वाराणसी आणि अयोध्या दोन्ही शहरांत शाळांना सुटी घोषित करण्यात आली आहे.