प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, १६ जानेवारी (वार्ता.) : पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती आणि द्वारकापीठाचे जगद्गुरु शंकराचार्य सदानंद सरस्वती यांचे १६ जानेवारी या दिवशी कुंभनगरीत शुभागमन झाले.

या वेळी जगद्गुरु शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्या आगमनाच्या वेळी पुष्कळ मोठी शोभायात्रा काढण्यात आली होती. घोडे, उंट, रथ यांवर बसून शंकराचार्य पीठाशी संबंधित साधू, संत यांचे आगमन झाले. यामध्ये शंकराचार्यांसाठी उत्तरप्रदेश पोलीस बँड पथकाकडून सलामी देण्यात आली. शंकराचार्यांच्या मिरवणुकीत अनेक रथांचा समावेश होता. हिंदूंनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित राहून शंकराचार्यांचे स्वागत केले आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष केला.