१. संतांवर लोक प्रेम करतात; कारण त्यांचे देह प्रेममय असतात. संतांचे देह मऊ लुसलुशीत असतात; कारण त्यांच्या मनाची मृदुता पराकोटीची असते.
२. वेदांतावर चर्चा करता आली, ‘वेद जाणला’, असे वाटले, तरी देहबुद्धीचा अभिमान धरू नये; कारण वेद ही ईश्वराचीच निर्मिती आहे आणि जाणवून देण्याची प्रक्रियाही ईश्वरच करतो.
३. देहबुद्धीतून, देहबुद्धीच्या कचाट्यातून सुटका करून घेऊन ज्याने इंद्रियांवर सत्ता प्रस्थापित केली, तोच खरा स्वामी !
४. गुरुतत्त्व अवर्णनीय आहे. ते बुद्धीगम्य नाही. ते अंतरंगात अनुभवावयाचे आहे. ते सर्वव्यापी आहे. ते नाही अशी जागा या जगात आणि परलोकातही नाही.
५. जी भूमी आपल्याला दिसलेली नाही, जे ज्ञान आपल्याला झालेले नाही, अशी प्रचंड भूमी आहे, तिला ‘परलोक’ म्हणतात. हे जाणायचे असेल, तर शरणागती आवश्यक आहे.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)