ज्ञानोत्तर जिज्ञासा ठेवून साधकांसाठी कार्यरत असणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधना करणार्‍याला त्‍याच्‍या साधनेच्‍या संदर्भातील तात्त्विक ज्ञान, म्‍हणजेच अध्‍यात्‍मशास्‍त्र कळल्‍यावर साधना करणे सुलभ जाते. सध्‍या हे ज्ञान एकत्रित उपलब्‍ध नाही. त्‍यासाठी अनेक ग्रंथ वाचावे लागतात. त्‍यातूनही आवश्‍यक ते ज्ञान फार अल्‍प प्रमाणात मिळते. त्‍यामुळे साधकाचा वेळ वाया जाऊन त्‍याला प्रत्‍यक्ष साधना करण्‍यासाठी फार अल्‍प वेळ मिळतो.

साधकांचा ज्ञान मिळवण्‍यामधील वेळ वाचावा आणि त्‍यांना तो वेळ प्रत्‍यक्ष साधना करण्‍यासाठी देता यावा, या उद्देशाने मी विविध ग्रंथ वाचून त्‍यातील आवश्‍यक ज्ञान निवडत आहे. त्‍यामुळे साधकांना त्‍यांच्‍या विषयांच्‍या संदर्भातील विविध ग्रंथांमधील ज्ञान एकाच ग्रंथात मिळणार आहे. सनातन संस्‍थेने या ज्ञानाच्‍या आधारे आतापर्यंत ३६६ ग्रंथ प्रकाशित केले आणि अजून ५००० ग्रंथ प्रकाशित होतील, इतके लिखाण संग्रही आहे.

आता इतके ज्ञान संग्रही झाल्‍यावर विचार आला की, ‘अध्‍यात्‍म हे अनंताचे शास्‍त्र आहे. त्‍यामुळे त्‍याचा कितीही अभ्‍यास केला, तरी अपुराच आहे. त्‍यामुळे आता वाचन थांबवून प्रथम संग्रही ज्ञानाच्‍या आधारे ग्रंथ प्रकाशित करूया.’ मग दुसरा विचार आला की, ‘माझ्‍या पुढच्‍या पिढीला ग्रंथ वाचून त्‍यांतील आवश्‍यक लिखाण निवडणे कठीण जाऊ शकते. त्‍या तुलनेत त्‍यांना संग्रही ज्ञानाच्‍या आधारे ग्रंथ प्रकाशित करणे सोपे जाईल.’ त्‍यामुळे मी ग्रंथवाचन चालू ठेवले आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले