पुणे येथे पोलीस हवालदाराचे गुन्हेगारी स्वरूप उघड !
पुणे – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामध्ये (सी.बी.आय.मध्ये) ६ वर्षे प्रतिनियुक्तीवर काम केलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील हवालदार विनोद थोरवत याने सी.बी.आय. अधिकारी असल्याचे सांगून एका उद्योजकाकडून १२ लाख रुपये घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उद्योजक सुहास वानखडे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर गुन्हा नोंद होऊन थोरवत याला अटक करण्यात आली.
त्याला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचा साथीदार मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर आहे. सध्या तो सी.बी.आय.च्या मुंबई कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. त्याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला. या दोघांनी मिळून वानखडे यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिकापोलिसांनी गुन्हे करणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार होय ! अशा पोलिसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे ! |