पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आता जपानची राजधानी टोकियो शहरामध्ये उभारण्यात येणार आहे. जानेवारी अखेरीस स्मारकाचे भूमीपूजन होणार असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रातील ११ गडांची माती आणि पाणी भूमीपूजनासाठी नेण्यात येणार आहे. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने ‘अखिल जपान भारतीय महासंघ’ आणि ‘एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्यो’ यांच्या सहकार्याने टोकियो शहरामध्ये हा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी दिली.
‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत महाराष्ट्रातील ११ गडांना प्रास्ताविक नामांकन मिळालेले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा १२ गडांचा समावेश आहे. याचा प्रसार करणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. या पुतळ्याची निर्मिती पुण्यातील विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल आणि विराज करणार आहेत.