समाजाचे आजचे चित्र पालटण्यासाठी देव, देश आणि धर्म कळणे महत्त्वाचे !

समाज सुशिक्षित झाला; पण शिक्षित झाला, असे नाही. समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. जोपर्यंत समाजाला देव, देश आणि धर्म कळणार नाही, तोपर्यंत हे चित्र पालटणार नाही. प्रत्येक धर्मात चांगली शिकवण आहे; पण नको ते घेतल्याने आजच्या सारखी परिस्थिती येते. जर वेळेतच सर्व कळले, तर अशी स्थिती ओढवणार नाही. म्हणून सामाजिक माध्यमांसह संत आणि हिंदु संस्कृती यांच्या या पावन भूमीत कीर्तन, प्रवचन किंवा व्याख्याने यांसाठी तरुणांनी अधिकाधिक वेळ द्यायला हवा, तसेच सर्व अनुभवी लोकांनी हिंदु कार्यासाठी वेळ दिला पाहिजे. ‘आपल्यामुळे इतरांचे चांगले झाले पाहिजे’, या संतांच्या भूमिकेचे अनुकरण केले पाहिजे !

– श्री. बाळू आगळे, उंड्री, जिल्हा पुणे. (२०.१०.२०२४)