मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेळ्तंगडि येथे २४ वर्षीय जुमार नावाचा वासनांध एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे तिचा भ्रमणभाष क्रमांक विचारत असे. तसेच एके दिवशी तिला तो म्हणाला की, तुला दुचाकीवरून घरी सोडतो. यावरून वेणूर पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. बेळ्तंगडि तालुक्यातील कुक्केडी गावात असलेल्या पुल्लायी भागात ही घटना घडली. जुमार हा गवत कापणी यंत्र चालवणारा कामगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडिता अन्य विद्यार्थिनीसमवेत महाविद्यालयात जातांना जुमार याने दुचाकीवरून सलग ५ दिवस तिचा पाठलाग करून तिला त्रास दिला.
Belthangady Dakshina Kannada (Karnataka): Case registered against a man named Jumar for harassing a minor student!
How do the minorities of this country become the majority in every crime? Will any Humanitarian organization make a report on this now?#HinduJago #assault pic.twitter.com/cW1Q8NTt1c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 23, 2024
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे सर्वच गुन्ह्यांत बहुसंख्य कसे ? याचा अहवाल आता कुणी समाजसेवी संस्था बनवेल का ? |