मुंबई – नवरात्रोत्सवावर आतंकवादाचे सावट असल्याने गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. रेल्वेस्थानक, मॉल्स, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता आहे. ‘अशा वेळी नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सणाला गालबोट लावण्याच्या उद्देशाने तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक कार्यरत आहेत. यामुळे खोलीमालक, हॉटेलमालक, पर्यटक आदींना या प्रकरणी सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे. पारपत्र आणि व्हिसा काळजीपूर्वक पडताळण्याचा, तसेच सणाच्या वेळी तांत्रिक उपकरणे न वापरण्याचाही आदेश मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.
🚨 Heavy Police Deployment in ₹Mumbai in the shadow of terrorism during Navratri Festival
👉The fear of a terrorist attack is becoming a norm at every #Hindu festival. #HinduRashtra alone is the solution for this state of affairs #Navratri2024 #Dasara #DurgaPuja… pic.twitter.com/aqiIm8rMt5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 29, 2024
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या प्रत्येक सणांवर आतंकवादाचे सावट असत; अशी स्थिती हिंदु राष्ट्रातच नसेल ! |