Maldives Sees Drops Of Tourists From India : मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत यावर्षी ५० सहस्रांहून अधिक घट

९ महिन्यांत ८८ सहस्र भारतीय पर्यटकांनी दिली मालदीवला भेट

माले  (मालदीव) – भारतीय पर्यटकांनी मालदीववर अघोषित बहिष्कार घातल्यानंतर मालदीव सरकार भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आटापिटा करत आहे; मात्र यात तो यशस्वी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्याच्या आधीच वाईट अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.

मालदीवमध्ये या वर्षी भारतीय पर्यटकांच्या संख्येत ५० सहस्रांहून अधिक घट  झाली आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी २४ सप्टेंबरपर्यंत भारतातून १ लाख ४६ सहस्र ५७ पर्यटक मालदीवमध्ये आले होते. त्याचवेळी, यावर्षी २४ सप्टेंबरपर्यंत भारतातून येणार्‍या पर्यटकांची संख्या केवळ ८८ सहस्र २०२ आहे. अशा प्रकारे भारतीय पर्यटकांच्या संख्येत ५७ सहस्र ८५५ ने घट झाली आहे.

संपादकीय भूमिका

भारतविरोधी आणि चीनप्रेमी मालदीवच्या विरोधात भारतियांनी कठोर भूमिका घेतली असतांना ८८ सहस्र भारतीय पर्यटक तेथे जातात कसे ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. हे पर्यटक कोण आहेत ? याची चौकशी झाली पाहिजे !