Rajasthan Rail Jihad : राजस्‍थानमध्‍ये रेल्‍वे अपघाताचा तिसरा प्रयत्न उघड; रेल्‍वे रुळांवर सापडला सिमेंटचा ठोकळा !

शाहरुख नावाच्‍या व्‍यक्‍तीचा शोध घेत आहेत पोलीस

अजमेर (राजस्‍थान) – उत्तरप्रदेशमधील कानपूरनंतर आता राजस्‍थानमध्‍येही रुळांवर अवजड वस्‍तू ठेवून रेल्‍वे अपघात घडवण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. राजस्‍थानमधील अजमेर जिल्‍ह्यामध्‍ये रेल्‍वे रुळावर अनुमाने १०० किलो वजनाचे सिमेंटचे ठोकळे आढळून आले आहेत. या ठोकळ्‍यांच्‍या आडून एका मालगाडीला अपघात घडवण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे.

पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट (दाखल) !

केवळ एक ठोकळाच नाही, तर त्‍याच्‍यापुढे साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंत सिमेंटचा दुसरा ठोकळा ठेवण्‍यात आला होता. अजमेरमधील सराधना आणि बांगड ग्राम रेल्‍वे स्‍थानकांच्‍या दरम्‍यान हा घातपाताचा प्रयत्न करण्‍यात आला. या प्रकरणी रेल्‍वे कर्मचारी रवी बुंदेला आणि विश्‍वजित दास यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केली आहे. ८ सप्‍टेंबरला रात्री १० वाजून ३६ मिनिटांच्‍या सुमारास रेल्‍वे रुळांवर सिमेंटचा ठोकळा ठेवण्‍यात आल्‍याची माहिती मिळाली. घटनास्‍थळी पोहोचल्‍यावर तो तुटलेल्‍या स्‍थितीत सापडला. आणखी एक किमी अंतरावर आणखी एक ठोकळा तुटून बाजूला पडलेला आढळला. दोन्‍ही ठोकळे वेगवेगळ्‍या ठिकाणी ठेवण्‍यात आले होते, असे प्रथमदर्शी अहवालात नमूद करण्‍यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून शाहरुख नावाच्‍या व्‍यक्‍तीचा शोध घेतला जात आहे.

घातपाताचा तिसरा प्रयत्न !

ठोकळे सापडल्‍यानंतर रेल्‍वेच्‍या अधिकार्‍यांनी सराधना येथून बांगड ग्रामपर्यंत टेहाळणी केली; मात्र या मार्गात सर्व सुरळीत असल्‍याचे दिसून आले. यापूर्वी रेल्‍वेचा अपघात घडवण्‍याचा प्रयत्न झाल्‍याची ही तिसरी घटना आहे. याआधी २८ ऑगस्‍टला छबडा येथे मालगाडीच्‍या मार्गावर दुचाकीचे भंगार ठेवण्‍यात आले होते. ९ सप्‍टेंबर या दिवशीच उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे रेल्‍वे रूळांवर सिलिंडर ठेवण्‍यात आला होता. त्‍याला कालिंदी एक्‍स्‍प्रेसची धडक बसली होती.

संपादकीय भूमिका

  • वारंवार होणारे रेल्‍वे अपघात आणि त्‍या माध्‍यमातून होणारी जीवित, तसेच वित्त हानी पहाता अशा समाजकंटकांवर तात्‍काळ कठोर कारवाई होणे आवश्‍यक !
  • ‘रेल्‍वे जिहाद’च्‍या माध्‍यमातून अस्‍थिरता निर्माण करण्‍याचाच हा प्रयत्न !