योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
‘खरे गुरु मनुष्याला जे धनापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे पारमार्थिक सुख आणि समाधान देतात. ते सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असे विद्याधनही देतात. ज्या धनापासून कोणतीही चिंता नाही की ज्याची कधीही चोरी होत नाही, असे विद्याधन गुरु देतात. खरेतर मिळालेल्या या विद्याधनाचा आपल्याला नीटसा परिचय नसतो. त्यामुळे आपण तो बारकाईने करून घ्यायला हवा !’ (१३.७.२००८)