Germany Deports Afghan Nationals : २८ अफगाण गुन्हेगारांना जर्मनीने अफगाणिस्तानात परत पाठवले !

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीने गुन्हेगारी कृत्य करणार्‍या २८ अफगाण नागरिकांना कतार एअरवेजच्या चार्टर विमानात बसवून अफगाणिस्तानात पाठवून दिले आहे. इतकेच नव्हे, तर या गुन्हेगारांना जर्मनीने १ सहस्र युरो (सुमारे ९३ सहस्र रुपये) दिले. हे कमी म्हणून की काय, विमानात त्यांच्यासमवेत एका डॉक्टरलाही पाठवण्यात आले. जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेगर यांनी या गुन्हेगारांना परत पाठवण्याच्या निर्णयाला जर्मनीच्या सुरक्षेचा विषय म्हटले आहे. जर्मनीचे तालिबानशी राजनैतिक संबंध नाहीत. त्यामुळे या गुन्हेगारांना अफगाणिस्तानात पाठवण्यात कतारने मध्यस्थी केली.

संपादकीय भूमिका

जर्मनी जे करू शकते, ते भारत घुसखोरांविषयी का करत नाही ? भारताची गांधीगिरी भारताचा विनाश करूनच थांबणार, असेच चित्र असून हे लज्जास्पद आहे !