१. श्री. आशुतोष कुमार पाण्डेय (राष्ट्रीय अध्यक्ष, भूसुर वेलफेअर फाऊंडेशन),गोरखपूर, उत्तरप्रदेश.
अ. ‘आश्रम संपूर्णपणे आध्यात्मिक ऊर्जेनी व्याप्त आहे.
आ. येथील मांडणी, स्वच्छता आणि व्यवस्था अतिशय उत्तम आहे.
इ. येथे शांती आणि देवत्व यांची अमर्याद अनुभूती येते.
२. श्री. विशाल ताम्रकार (राष्ट्रीय समादेशक [सल्लागार], लक्ष्य सनातन संगम), दुर्ग, छत्तीसगड.
अ. ‘हिंदुराष्ट्रा’चे स्वप्न साकार होईल.
आ. हा आश्रम स्वयंभू स्वर्ग आहे.
इ. अशा आश्रमाचा प्रचार, प्रसार आणि निर्मिती हीच भविष्यातील भारताची निर्मिती आहे.’
३. अधिवक्ता ब्रह्मानंद पांडे (उच्च न्यायालय), जबलपूर, मध्यप्रदेश.
अ. ‘मला आश्रमात हिंदुसंस्कृतीबद्दलच्या अनेक गोष्टी विज्ञानाच्या दृष्टीकोनातून शिकायला मिळाल्या. ‘अशा प्रकारे येणार्या पिढीला आपण अध्यात्म शिकवू शकवूतो’, हे माझ्या लक्षात आले.’
४. अधिवक्ता नितीन कुमार मिश्रा, रायगड, महाराष्ट्र.
अ. ‘अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम असलेला असा आश्रम मी कधीच पाहिला नव्हता.
आ. आश्रमात सर्वत्र आल्हाददायक आणि दैवी वातावरण आहे.
इ. येथे मनाला शांती आणि पावित्र्य यांची अनुभूती येते.
५. डॉ. देवकरण शर्मा (संस्थापक, सप्तर्षी गुरुकुल), उज्जैन, मध्यप्रदेश.
अ. ‘जणूकाही सात्त्विकतेचा ते वर्षाव होत आहे’, असे वाटले.
आ. सर्व साधक आपापली सेवा मन लावून आणि भावपूर्ण करत आहेत.
इ. आश्रमाची वास्तूरचना अद्भुत, प्रशंसनीय, वैज्ञानिक आणि कलात्मक आहे. अशी सात्त्विक वास्तूरचना अन्यत्र कुठेही पहाण्यात आली नाही.’
६. डॉ. नीलेश ओक (इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड सायन्सेस), अमेरिका
अ. ‘आश्रम अतिशय स्वच्छ असून येथील वातावरण आनंददायी आणि सात्त्विक आहे. आश्रमातील साधक सतत आनंदी असतात.’
७. पू. गुरु मां भुवभुनेश्वरी पुरी(संस्थापिका, श्रीकुलम् आश्रम आणि श्रीविद्या वन विद्यालय), उदयपूर,राजस्थान.
अ. ‘सात्त्विकता, तेजस्विता, श्रद्धा, परिश्रम, संकल्प इत्यादी सर्व दैवी गुण सनातन संस्थेच्या रूपात प्रत्यक्ष आहेत’, असे वाटले. हे केवळ ईश्वरी कृपेमुळे शक्य आहे.
आ. आश्रमाची वास्तूरचना आणि व्यवस्थापन अद्वितीय आहे.
इ. आश्रमातील सर्वाधिक स्मरणात रहाणारी आणि प्रभावित करणारी सूत्रे म्हणजे ‘प्रत्येक साधकाचा श्रेष्ठ प्रतीचा भाव (दैवी भाव)’ अन् ‘समर्पण’, ही आहेत.
८. स्वामी समानंदगिरि महाराज, महंत आणि प्रबंध विश्वस्त, संवित् गंगायन ट्रस्ट, हरिद्वार अन् सप्तमातृका आश्रम, महेश्वर, मध्यप्रदेश.
अ. ‘येथील कार्यात एक प्रकारचा सुसंवाद असल्याचे लक्षात आले.’
९. अधिवक्ता दीपक कुमार सिंह (ज्ञानवापी अभियोग), वाराणसी, उत्तरप्रदेश.
अ. ‘येथे मला अमर्याद शांतीची अनुभूती आली.
आ. आश्रम म्हणजे ज्ञान आणि विज्ञान यांचे केंद्र आहे. यासंबंधी कितीही लिहिले, तरी शब्द अपुरे आहेत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |