पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे गाऊया यशोगान ।

‘आज श्रावण कृष्ण चतुर्दशी (१.९.२०२४) या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

त्यांना विनम्र अभिवादन करून ही काव्य श्रद्धांजली वाहूया आणि एकमुखाने त्यांचे यशोगान गाऊया !

सुश्री (कु.) मधुरा भोसले

बुद्धीमान, रूपवान ।
कन्यारत्न गुणवान ।
श्रद्धाळू अन् चारित्र्यवान ।
अहिल्याबाई परम भाग्यवान ।। १ ।।

होळकरांचे घराणे ऐश्वर्ययुक्त अन् धनवान ।
परम प्रतापी सुभेदार उदार आणि महान ।
अहिल्याबाईचे स्वीकारूनी कन्यादान ।
होळकरांना सून लाभली पुण्यवान ।। २ ।।

वयाने होती जरी लहान ।
बुद्धीने होती अतिशय प्रतिभावान ।
श्रद्धेने केले शिवशंकराचे गुणगान ।
अहिल्याबाई झाली पुत्रवान ।। ३ ।।

मल्हाररावांनी रत्न अचूक पारखले ।
अहिल्याबाईला उत्तम घडवले ।
सुनेला राजनीती अन् धर्मशास्त्र शिकवले ।
राजकारणाचे सर्वाेत्तम शिक्षण दिले ।। ४ ।।

सौख्याचे दिवस लवकर संपले ।
सौभाग्यवतीचे कुंकू पुसले ।
प्रजेचे दायित्व सुनेने स्वीकारले ।
सती न जाण्याचे तिने ठरवले ।। ५ ।।

वैधव्याचे दुः ख भोगले ।
पुत्रवियोगही तिने सोसले ।
दुः खाचे विष गिळून टाकले ।
देशसेवेत स्वतःला वाहून घेतले ।। ६ ।।

राज्यात नदीकिनारी घाट बांधले ।
शेतकर्‍यांना साहाय्य केले ।
चिरे बांधून कळस चढवले ।
अनेक मंदिरांचे जीर्णाेद्धार केले ।। ७ ।।

धर्मनिष्ठ राज्य चालवले ।
नीतीसंपन्न शासन केले ।
काटकसरीने धन वापरले ।
राज्यकारभार सांभाळला उत्तम प्रकारे ।। ८ ।।

प्रजेचे हित जिवापाड जपले ।
प्रजेच्या सुखात समाधान मानले ।
होळकरांचे स्वप्न साकार झाले ।
रामराज्य धरणीवर आले ।। ९ ।।

शिवासह शक्तीची उपासना केली ।
युद्धकलाही तिने अवगत केली ।
राणी शस्त्रांनी सुसज्जित झाली ।
घोडदळासह युद्धक्षेत्रात उतरली ।। १० ।।

राघोबाला धनाची हाव सुटसुली ।
त्याला नारी अबला वाटली ।
राघोबाने सैन्यासह चढाई केली ।
गुप्तहेरांनी बातमी सांगितली ।। ११ ।।

अश्वारूढ अहिल्येने सिंहगर्जना केली ।
खडसावून राघोबाची कानउघाडणी केली ।
लोकलज्जेस्तव त्याने माघार घेतली ।
बाणेदार अहिल्याबाई विजयी झाली ।। १२ ।।

दुः खाचे पर्वत जरी कोसळले ।
संकटामागून जरी संकट आले ।
नशिबाने पुष्कळ घाव घातले ।
अहिल्याबाईने सर्व सोसले ।। १३ ।।

रामराज्याचे आदर्श मांडले ।
राजधर्माचे आचरण केले ।
शिवभक्तीने सदैव तारले ।
अहिल्याबाईने कैलासगमन केले ।। १४ ।।

– सुश्री (कु.) मधुरा  भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२४)