अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पालघर – येथील तारापूरमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बळजोरी करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सामाजिक माध्यमे पाहून दुचाक्यांची चोरी
मुंबई – उच्चशिक्षित बेरोजगार तरुण आकाश मकवाना (वय २७ वर्षे) याने सामाजिक माध्यमांवर दुचाकी चोरी कशी करायची ? या माहितीचा अभ्यास केला आणि दोन दुचाकी चोरल्या. हा प्रकार भांडुप येथे उघडकीस आला. या आरोपीला भांडुप पोलिसांनी २ दिवसांपूर्वी अटक केली असून त्याने चोरलेल्या २ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.
संपादकीय भूमिका : सामाजिक माध्यमांच्या विळख्यात अडकण्याचे दुष्परिणाम !
दिग्दर्शिकेच्या घरी चोरी !
मुंबई – मराठी चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या अंधेरी येथील सहाव्या मजल्यावरील घरात चोरी झाली. चोराने ड्रेनेज पाईपवरून चढून खिडकीतून पहाटे ३ वाजता घरात प्रवेश केला. ६ सहस्र रुपये चोरून तो पळून गेला.