मुंबई – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदु नववर्ष स्वागत समिती, बोरिवलीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी सकल हिंदु समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दीड सहस्रांहून अधिक हिंदू येथे जमले होते. त्यात महिलांचाही समावेश होता. विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, विश्व संवाद केंद्रचे कोकण प्रांत संपादक पराग नेरूरकर, भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खंणकर यांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. भाजपचे आमदार सुनील राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर सहकार्यवाह विलास भागवत यांनीही मोर्चात सहभाग घेतला होता.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चात दीड सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !
बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चात दीड सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !
नूतन लेख
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : क्रिकेट सामन्यांच्या सुरक्षा शुल्कातील सवलतीमुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची हानी !
- महाराष्ट्रात राबवले जात आहे ७ वर्षांपूर्वीचे क्रीडा धोरण !
- अहिल्यानगर शहरातील मोची गल्ली येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेला बेदम मारहाण करून केला विनयभंग !
- कामकाजाची माहिती संकेतस्थळावर न ठेवणार्या जनमाहिती अधिकार्यांच्या विरोधात राज्य माहिती आयोग करणार दंडात्मक कारवाई !
- महाराष्ट्रात ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन !
- छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही काळात महत्त्वाचे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक