चित्रकूट (मध्यप्रदेश) – येथे २ जून या दिवशी काही गुंडांनी महात्मा मौनीजी यांच्या घरात बलपूर्वक घुसून त्यांचे घर लुटले. गुंडांनी महात्मा मौनीजी यांच्या सामानाची नासधूस करून ते बाहेर फेकून दिले आणि नंतर मंदिर अन् त्यांचे घर कह्यात घेतले. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी अद्याप आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला नाही. हे सर्व पोलिसांच्या संगनमताने घडले आहे, असा आरोप मौनीजी यांनी केला आहे.
संपादकीय भूमिकाभाजपच्या राज्यात अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते ! |