कॅनडा : मॉन्ट्रियाल आणि टोरंटो येथे बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ आंदोलन !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]
आंदोलन करतांना नागरिक

ओटावा (कॅनडा) – बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराला जगभरातून विरोध केला जात आहे. भारतातील किमान २०० शहरांमध्ये या विरोधात निदर्शने झाली आहेत. अमेरिकेतील मिशीगन येथेही १२ ऑगस्टला आंदोलन झाले होते. असेच आंदोलन फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात १६ ऑगस्ट या दिवशी, आयर्लंडची राजधानी डुब्लिन येथे १७ ऑगस्ट, तर कॅनडातील मॉन्ट्रियाल आणि टोरंटो शहरात १८ ऑगस्ट या दिवशी झाले. अशाच स्वरूपाचे आंदोलन ब्रिटन, बेल्जियम, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्येही झाले. या आंदोलनांमध्ये त्या-त्या शहरातील शेकडो हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला, तसेच त्या-त्या देशातील बांगलादेशाच्या दूतावासाला मागण्यांचे निवेदनही दिले.

संपादकीय भूमिका 

हिंदूंकडे कुणी वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, अशी पत आता जगभरातील हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]