संतप्त नागरिकांनी शाळेची तोडफोड करून आग लावली !
गौहत्ती (आसाम) – आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीला भ्रमणभाष संचावर अश्लील व्हिडिओ (पॉर्न) दाखवून तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट या दिवशी घडली होती.
Case registered against a headmaster In Karimganj (Assam) for showing an obscene video to a student.
Angry locals vandalize and set the school on fire!
What example will such a principal set before the children? Such people should be severely punished!#Parents pic.twitter.com/HatXVjRZlA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 19, 2024
पोलिसांनी सांगितले की, जेव्ही पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाला ही घटना समजली, तेव्हा त्यांनी मुख्याध्यापकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो शाळेतून पळून गेला. यानंतर स्थानिक लोकांनी शाळेची तोडफोड करून आग लावली. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवतो, जेणेकरून ते शिक्षण घेऊन चांगले माणूस बनतील; पण अशा शिक्षकाकडून आमची मुले काय शिकणार ?
संपादकीय भूमिकाअसे मुख्याध्यापक मुलांसमोर काय आदर्श ठेवणार ? अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! |