मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), १८ ऑगस्ट (वार्ता.) – भारतात महिला, मुली यांच्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार, त्यांची हत्या ही अत्यंत गंभीर, तसेच लाजिरवाणी गोष्ट आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण आपण सुरक्षित राहिलो नाही. समाजामध्ये महिला आधुनिक वैद्यांचा वैद्यकीय सेवेमध्ये महत्त्वाचा वाटा असून अशा प्रकारच्या हत्या थांबल्या नाहीत, तर समाज या सेवांपासून वंचित राहील. त्यामुळे कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला आधुनिक वैद्यावर बलात्कार करून तिची हत्या करणार्या आरोपीला तात्काळ फाशी द्या, अशी मागणी सनातन संस्थेचे वैद्य संजय गाधी यांनी केली. कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ मलकापूर गावात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित यांनी निषेध फेरी काढली. फेरीच्या समारोपप्रसंगी वैद्य संजय गांधी बोलत होते.

या फेरीमध्ये ‘शाहूवाडी तालुका वैद्यकीय संघटने’चे अध्यक्ष वैद्य निखिल सातपुते, पदाधिकारी, सदस्य, औषध विक्रेते संघटनेचे अध्यक्ष शिवाजी दळवी आणि सदस्य सहभागी झाले होते. फेरीनंतर शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शिवाजी घेरडे यांना निवेदन देण्यात आले.
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच