आतंकवादी झाकिर नाईक याचा सहभाग असल्याची शक्यता !
मुंबई – उल्हासनगरमधील गणेशनगर येथील हिंदु महिला कल्पना चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीला फसवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याची तक्रार येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये केली होती. या प्रकरणात त्यांच्या मुलीच्या भ्रमणभाषमध्ये भारताने फरार घोषित केलेला आणि आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देणारा इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईक याचे व्हिडिओ आढळले आहेत. यामागे आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी करण्यासाठी आणखीही काही जणांचा सहभाग असू शकतो. या दृष्टीने अन्वेषण करण्यासाठी या प्रकरणाचे अन्वेषण पोलिसांकडून आतंकवादविरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
कल्पना चौधरी आणि तिचे पती यांना विश्वासात न घेता त्यांच्या घराजवळ रहाणार्या शबीना शेख आणि महेक शेख यांनी चौधरी यांच्या मुलीचे धर्मांतर घडवून आणले होते. यासाठी येथील काही स्थानिक मुसलमान आणि मौलवी यांनी हे धर्मांतर घडवून आणल्याचे आढळून आले होते. कल्पना चौधरी यांच्या धर्मांतरीत झालेल्या मुलीने तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली होती.