|

अयोध्या (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. समाजवादी पक्षाचा नेता मोईद खान आणि त्याचा नोकर राजू खान यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. मागासवर्गीय अल्पवयीन हिंदु पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेलही करण्यात आले. यातून तिच्यावर तब्बल २ महिने बलात्कार करण्यात आला. ३० जुलै या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंद करून मोईद खान आणि राजू खान यांना अटक केली. समाजवादी पक्षाचे स्थानिक खासदार अवधेश प्रसाद यांचा मोईद खान जवळचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, महिलांवर अत्याचार करणार्यांची गय केली जाणार नाही !
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना अयोध्येतील पुरकलंदर पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. मोईद खान याचे येथील भदरसा चौकी परिसरात दुकान आहे. येथे अडीच महिन्यांपूर्वी १२ वर्षीय मुलगी तिच्या आईसह मजुरीचे काम करून परतत होती. वाटेत मोईद खानच्या दुकानात काम करणारा राजू खान याने पीडितेला आमीष दाखवून दुकानात बोलावले. ही मुलगी यापूर्वीही या दुकानात येत होती. त्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती तिथे गेली.

दुकानात दोघांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या वेळी आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओ दाखवून तिला धमकावून दोघांनी पीडितेवर २ महिने बलात्कार केला. यामुळे पीडिता गर्भवती राहिली. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईला संशय आला. पीडितेने संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. अखेर या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून घोषणाबाजी चालू केली आणि आरोपींवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमानांचे लांगूलचालन करणारा समाजवादी पक्ष, तसेच तेथील मुसलमान आता अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीत खोल खड्डा करून मोईद खानला कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी करतील का ? |
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला