
मुंबई – हिंदु मुली गायब होत आहेत. कधी कपाटात, कधी समुद्रात, कधी शीतकपाटात, तर कधी सुटकेसमध्ये त्यांचे मृतदेह आढळत आहेत. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले. आता हिंदूंना धर्मासाठी लढण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांनी यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येविषयी सामाजिक माध्यमावर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
पोलीस आणि प्रशासन आपल्या बाजूने नाहीत. त्यामुळे हिंदूंना एकत्र येणे आवश्यक आहे, असेही केतकी चितळे यांनी म्हटले आहे. उरण (जिल्हा रायगड) येथे दाऊद शेख याने यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या केली. या पार्श्वभूमीवर केतकी चितळे यांनी व्हिडिओ प्रसारित केला आहे.
केवळ मुसलमानबहुल नव्हे, सर्व स्तरांवर ‘लव्ह जिहाद’ !
लव्ह जिहाद केवळ उत्तरप्रदेश, केरळ आणि बंगाल या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे, हे खोटे आहे. केवळ मुसलमानांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी लव्ह जिहादच्या घटना घडतात, हेही खोटे आहे किंवा लव्ह जिहादच्या घटना ग्रामीण भागांत घडतात, हेही खोटे आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांसमवेत लव्ह जिहादच्या घटना घडतात, हेही खोटे आहे. शहरे-गावे सर्वच स्तरांवर लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत, असे या व्हिडिओमध्ये केतकी चितळे यांनी म्हटले आहे.
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !