१. भावसत्संगाचे भक्तीसत्संगात रूपांतर होण्यापूर्वीची भावस्थिती
१ अ. भावसत्संगाची ओढ लागणे : ‘५.८.२०१६ या दिवसापासून प्रति गुरुवारी पहिला भावसत्संग चालू झाला. तेव्हा आरंभी ‘वैयक्तिक सर्व सेवा बाजूला ठेवून भावसत्संग ऐकूया’, असे मला वाटत असे. मला भावसत्संगाची एक वेगळीच ओढ लागली होती. ‘गुरुवार केव्हा येतो ?’, असे मला वाटत असे.
१ आ. भावसत्संगात ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ बोलण्यास प्रारंभ कधी करतील ?’, याचा ध्यास लागणे : प्रारंभी अन्य साधिकांच्या आवाजात भावसत्संग चालू व्हायचा. त्या वेळी मला वाटायचे, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलण्यास प्रारंभ कधी करतील ?’ त्यांच्या बोलण्याचा एक प्रकारे मला ध्यासच लागायचा.
१ इ. ‘हा केवळ भावसत्संग नसून भक्तीभाव वाढवणारा सत्संग असणे’ आणि ‘यातून साधना करण्यासाठी एक शक्ती मिळते’, असे वाटणे : एकदा मी अंतर्मुख होऊन प्रार्थना करून गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) म्हणालो, ‘गुरुदेव, हा नुसता भावसत्संग नाही, तर भक्तीभाव वाढवणारा सत्संग आहे. हा भावसत्संग अन्य सत्संगापेक्षा पुष्कळ वेगळा आहे. ज्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलतात, ‘तेव्हा त्यांचे बोलणे सहजतेने माझ्या अंतर्मनाला भिडून मला त्याचे आकलन होते. त्या वेळी भाव, भक्ती, चैतन्य आणि आनंद एकाच वेळी प्राप्त होतात. मला ‘हा केवळ भावसत्संग नसून भक्तीसत्संग आहे’, असे वाटते. ‘यातून साधना करण्यासाठी एक शक्ती मिळते’, असे मला वाटते.’
२. भावसत्संगाचे भक्तीसत्संगात रूपांतर झाल्यावर जाणवलेली वैशिष्ट्ये
२ अ. भक्तीसत्संग ऐकतांना काही वेळा मन निर्विचार होणे आणि या सत्संगामुळे चित्त शुद्ध होऊन गुरुप्राप्तीची तळमळ वाढणे अन् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजातून दैवी शक्ती प्रकट होणे : ७.८.२०२१ या दिवशी भावसत्संगाचे नाव ‘भक्तीसत्संग’ असे म्हणण्यास प्रारंभ झाला. भक्तीसत्संग ऐकतांना काही वेळा ‘माझे मन निर्विचार होते’, याचे कारण म्हणजे, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सत्संगात विविध प्रकारच्या शिष्य आणि ऋषी यांच्या कथा अन् पंचतत्त्वांचे महत्त्व आणि इतर अनेक प्रकारचे गुह्यज्ञान या भक्तीसत्संगात सांगतात. यामुळे चित्त शुद्ध होऊन गुरुप्राप्तीची तळमळ वाढते. तसेच या कथा सांगत असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजातून दैवी शक्ती प्रकट होते’, असे मला वाटते.
२ आ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतून ‘प्रत्यक्ष भगवंतच सत्संगात बोलत आहेत’, असे वाटणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, म्हणजे प्रत्यक्ष गुरुदेवच आहेत’, अशी दिव्यलीला मला अन्य प्रसंगातही अनुभवायला मिळते. पुष्कळ वेळा सत्संगात देवतांच्या कथा सांगितल्या जातात. त्या वेळी माता पार्वती भगवान शिवाला किंवा माता लक्ष्मी भगवान विष्णूला प्रश्न विचारतात. तेव्हा श्रीसत्शक्ति(सौ.) सिंगबाळ ‘‘भगवान’’, असे म्हणतात आणि काही सेकंद थांबतात. त्या वेळी ‘प्रत्यक्ष भगवंतच सत्संगात बोलत आहेत’, असे मला वाटते.
त्या वेळी मला महर्षींनी सांगितलेल्या वाक्याची आठवण होते. ‘भगवान शिव त्यांच्या ध्यानातून, तसेच विष्णु भगवानही निद्रा त्यागून भक्तीसत्संगावर कृपादृष्टी टाकत असतात.’
२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची वाणी म्हणजे ‘गुरुवाणी’ असणे
१. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सत्संगात गुरुदेवांविषयी सांगतांना ‘‘गुरुदेव काय म्हणाले, हे त्यांच्याच शब्दात ऐकू या’’, असे म्हणतात. त्या वेळी त्या काही सेकंद थांबल्यावर वाटते, ‘अरे, आता प.पू. गुरुमाऊली सत्संगात बोलणार !’
२. त्या वेळी ‘गुरुदेव बोलणार आहेत’, असे वातावरण निर्माण होते.
३. तेव्हा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीला कशाची उपमा द्यावी ?’, हे मला कळत नव्हते. नंतर त्यांची वाणी ‘ही गुरूंचीच वाणी आहे’, हे माझ्या लक्षात येते.
४. मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतून त्यांचा ‘निरपेक्ष भाव आणि उच्च कोटीची तळमळ’ दिसून येते.
५. ‘गुरुदेवांनी साधकांना दिलेला भक्तीसत्संगाचा हा प्रसाद सर्वांना मिळावा’, हा भाव त्यांच्या वाणीतून व्यक्त होत आहे’, असे मला जाणवते.
६. गुरुवाणीतून येणार्या भक्तीसत्संगातील कथा सर्व साधक मनापासून ऐकतात आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करतात.
२ ई. ‘भक्तीसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची वाक्ये ही शक्तीदायक, भक्तीदायक, उत्साह वाढवणारी आणि साधकांना कृतीप्रवण करणारी असतात.’
२ उ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या भक्तीसत्संगातील पुढील विषयाकडे जातांना म्हणतात, ‘चला तर मग !’ हे आनंददायी वाक्य ऐकण्यासाठी साधक पुष्कळ उत्सुक असतात.’
२ ऊ. मनाची स्थिती नकारात्मक असतांना भक्तीसत्संगातील काही शब्द आठवणे आणि नकारात्मक स्थिती निघून जाणे अन् पुन्हा सेवा करण्यास ऊर्जा मिळून मन सकारात्मक होणे : काही वेळा माझ्या मनाची स्थिती नकारात्मक होते. त्या वेळी अकस्मात् मला भक्तीसत्संगातील काही शब्द आठवतात. त्यातील शब्दांच्या आठवणीने ‘सगळी नकारात्मक स्थिती निघून जाते आणि मला परत सेवा करण्यास ऊर्जा मिळते. मन सकारात्मक होऊन माझे भावजागृतीचे प्रयत्न होतात. भक्त प्रल्हादाचे उदाहरण आठवते. ‘माझा त्रास काहीच नसून मी साधनेत किती न्यून पडतो’, याची मला जाणीव होते.
२ ए. जाणवलेली सूत्रे
१. भक्तीसत्संग ऐकतांना माझे मन निर्विचार होत असून ‘बाह्यमन आणि अंतर्मन शुद्ध होत आहेत’, असे मला वाटते.
२. ज्या वेळी भक्तीसत्संग चालू होतो, त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ प्रारंभी गुरूंचा श्लोक म्हणतात. त्या वेळी ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण बासरी वाजवत असून सर्व गोप-गोपी, गायी आणि वृक्ष बासरीची धून ऐकण्यासाठी देहभान विसरल्या आहेत’, असे मला जाणवते.
३. ‘भक्तीसत्संगाची महती संजीवनी प्रदान करणारी आहे.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः प्रणाम आणि कृतज्ञता ! ‘हे गुरुदेवा, ‘मी आपल्या कृपेने वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.’
– श्री. कृष्णा दत्तात्रय आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |