विवाहाचे आमीष दाखवले

जौनपूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील सरपताहा येथे वास्तव्य करणारी १६ वर्षीय हिंदु मुलगी लव्ह जिहादची शिकार बनली आहे. ही मुलगी हिमाचल प्रदेशमधील सिरमौर येथे कामाला होती. तेथे तिची ‘अमन’ नावाच्या युवकाशी ओळख झाली. अमन याने तो हिंदु असल्याचे भासवले. तो अन्य हिंदूंप्रमाणे मनगटावर धागा बांधत असे. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला बरेली येथे आणले. अमन याने १० दिवस तिला स्वतःच्या घरात ठेवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अमन याच्या घरी गेल्यावर त्या मुलीला तो मुसलमान असल्याचे कळले. अमन याच्या कह्यातून ती निसटली. तिने एका वाटसरूच्या साहाय्याने पोलीस ठाणे गाठले आणि अमन याच्या विरोधात तक्रार केली.
१. या मुलीने सांगितले, ‘मी अल्पवयीन असल्यामुळे माझा कायदेशीर विवाह होऊ शकत नाही’, असे मी अमनला सांगितले. त्याने मला लग्नाचे वचन दिले. मी त्याला सांगितले की, माझे कुटुंब हे मान्य करणार नाही; मात्र त्याने मला फसवून बरेली येथील त्याच्या घरी नेले.’
२. या मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, १३ जुलै या दिवशी अमनने मला त्याच्या बरेली येथे गावी नेले. तेथे त्याने माझे लैंगिक शोषण केले. त्याच्या गावात गेल्यानंतर मला त्याचे वास्तव कळले. त्याने ओळख लपवून माझ्याशी मैत्री केल्याचे मला तेव्हा समजले.
३. मला अमन याचे सत्य समजल्यावर त्याच्या वडिलांनी मला इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती केली.
संपादकीय भूमिकाअशा लव्ह जिहाद्यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain