सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेल्या सूत्रांचा काही भाग १२.७.२०२४ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/813314.html

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

३. पू. सीताराम देसाई (सनातनचे ५३ वे (व्यष्टी) संत, वय ८३ वर्षे) आणि पू. (सौ.) मालिनी देसाई (सनातनच्या ५२ व्या (व्यष्टी) संत, वय ७७ वर्षे) !

पू. सीताराम देसाई आणि पू. (सौ.) मालिनी देसाई

३ अ. वय अधिक असूनही साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची तळमळ असणारे पू. देसाईआजोबा आणि पू. (सौ.) देसाईआजी ! : पू. देसाईआजोबा आणि पू. (सौ.) देसाईआजी यांचे वय पुष्कळ आहे; पण ‘त्यांना सेवा करण्याची, साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची पुष्कळ तळमळ आहे’, असे मला जाणवते.

४. पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत, वय ६० वर्षे) !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

४ अ. पुष्कळ शारीरिक त्रास असूनही झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि सतत आनंदी असणार्‍या पू. डगवारकाकू ! : पू. डगवारकाकूंना विविध प्रकारचे पुष्कळ शारीरिक त्रास आहेत. असे असले, तरी त्या पुष्कळ झोकून देऊन सेवा करतात. त्यामुळे त्या सतत आनंदी असतात. त्या रुग्णाईत असल्याचा लवलेश त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नाही.

५. पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (सनातनच्या ९५ व्या (व्यष्टी) संत, वय ८४ वर्षे) !

पू. कुसुम जलतारे

५ अ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेल्या आणि मारकभावाने समष्टीसाठी नामजप करणार्‍या पू. जलतारेआजी !: पू. जलतारेआजींची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता चांगली आहे. साधकांसाठी उपाय म्हणून दिलेल्या नामजपात पालट झाला, तर पालट झालेला नामजप त्यांच्याकडून आधीच चालू झालेला असतो. त्या समष्टीचा त्रास दूर होण्यासाठी नामजप करतात; म्हणून त्यांच्या चेहर्‍यावर कधी कधी मारकभाव दिसून येतो.’

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.