मारेकरी तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा निकटवर्तीय असल्याचा दावा !
कोलकाता (बंगाल) – राज्यातील कमरहाटी जिल्ह्यात असलेल्या अरियादहा इझाके भागातील तलतला क्लबचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ४ पुरुषांनी एका महिलेचे हात-पाय पकडले असून अन्य दोघे जण तिला अमानुष लाठीमार करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ ८ जुलैला सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला असला, तरी पोलिसांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. अशातच महिलेला मारहाण करणारा मुख्य आरोपी जयंत सिंह हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांचा जवळचा सहकारी आहे, जो परिसरात सुपारी घेऊन लोकांची हत्या करण्यासाठी ओळखला जातो.
या प्रकरणी पोलिसांनी स्वत:हून नोंद घेत गुन्हा नोंदवला आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्या सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई चालू झाल्याचे समजते. यातील २ आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत.
पीडितेचा आक्रोश ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोचलीच नाही ! – भाजप
भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी या प्रकरणी आरोप करत म्हटले की, या महिलेचा आक्रोश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोचलाच नाही. बंगालमध्ये ही परिस्थिती सामान्य झाली आहे. राहुल गांधी हे बंगालमध्ये केव्हा जाणार ?
संपादकीय भूमिका
|