धर्माभिमानी आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गया, बिहार येथील कु. देवश्री रंजीत प्रसाद (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देवश्री प्रसाद ही या पिढीतील एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गया, बिहार येथील कु. देवश्री रंजीत प्रसाद हिचा आषाढ शुक्ल चतुर्थी (१०.७.२०२४) या दिवशी ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. देवश्री रंजीत प्रसाद हिला  ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

१. ‘कु. देवश्री नेहमी आनंदी असते.

श्री. रंजीत प्रसाद

२. धर्माभिमानी

अ. ‘देवश्री प्रतििदन कुंकू लावून शाळेत जाते.

आ. ती सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा प्रयत्न करते. तिला पूजा, सण आणि उत्सव यांमध्ये होत असलेल्या विडंबनाविषयी माहिती आहे. ती त्यासंबंधी लहान चित्रफिती बनवून तिच्या आत्याला पाठवते. एकदा तिने हलाल प्रमाणित वस्तूंवर चित्रफीत बनवली होती.

इ. एकदा ती एका लहान मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. तेथे ‘केक कापून वाढदिवस साजरा केला जात आहे’, हे पाहून तिने तत्परतेने सांगितले, ‘‘हिंदु धर्मात औक्षण करून वाढदिवस साजरा केला जातो. केक कापून नाही.’’

ई. तिच्या शाळेत मुलांना अन्य पंथानुसार एक वेशभूषा करून यायला सांगितल्यावर तिने तसे करायला नकार दिला.

उ. एकदा एका वैद्याने तिला चेहर्‍याला मलम लावायला सांगितले. ‘फ्लिपकार्ट’च्या (भ्रमणभाषद्वारे ‘ऑनलाईन’ खरेदी करू शकतो, अशा एका आस्थापनाच्या) माध्यमातून ते मलम घरी आल्यावर ‘ते हलाल प्रमाणित आहे’, हे पाहून तिने आम्हाला त्वरित ते परत करायला सांगितले.

ऊ. तिला देवतांवर केलेले विनोदी चित्र (कार्टून) पाहून राग येतो.

३. साधनेचे गांभीर्य

अ. ती संध्याकाळी आरती करते. ती काही वेळा आरती करू शकली नाही आणि त्या वेळी घरातील अन्य कुणीही आरती केली नाही, तर ती उदास होते.

आ. तिने काही मासांपासून स्वभावदोष सारणी (टीप १) आणि चिंतन सारणी (टीप २) लिहिणे चालू केले आहे.

(टीप १ – सारणी लिखाण : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती अन् विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती किंवा विचार लिहिणे.)

(टीप २ – चिंतन सारणी : साधकांच्या व्यष्टी साधनेचा नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृतीचे प्रयत्न आदींचा आढावा घेण्यासाठी केलेली सारणी)

इ. ती ‘स्वतःकडून पूर्वी झालेली चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी प्रयत्नरत असते.

ई. ती आम्हाला आमच्या चुका लक्षात आणून देते.

उ. तिच्याकडून काही वेळा साधनेचे काही प्रयत्न झाले नाही, तर ती लगेच गुरुदेवांचे छायाचित्र समवेत घेऊन बसते.

ऊ. ती नियमित भक्तीसत्संग ऐकते.

४. सेवेची तळमळ

अ. तिला बालसंस्कारवर्गात प्रार्थना सांगण्याची सेवा आहे. तिची कोणत्याही परिस्थितीत ही सेवा करण्याची सिद्धता असते.

आ. एकदा ती बालसंस्कारवर्गाच्या वेळात झोपली होती. त्या दिवशी ती प्रार्थना सांगण्याची सेवा करू शकली नाही. तेव्हा ती ‘स्वतःकडून सेवा झाली नाही’, म्हणून पुष्कळ रडली.

इ. एकदा बालसंस्कारवर्गाच्या दिवशी ती तिच्या मामाच्या लग्न समारंभात होती. तेव्हा तिने दुसर्‍या ठिकाणी जाऊन प्रार्थना सांगण्याची सेवा केली.

ई. ती ग्रंथप्रदर्शन आणि गुरुपौर्णिमा यां वेळी आम्हाला साहाय्य करते.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

अ. एकदा देवश्रीला शाळेत नृत्य करायला काही अडचणी येत होत्या. तेव्हा ‘गुरुदेवच मला सर्वकाही शिकवतील’, या श्रद्धेने तिने प्रार्थना केली. तेव्हा ती पदन्यास चांगल्या प्रकारे करू शकली. तिला अभ्यासातील काही समजले नाही, तर ती लगेच गुरुदेवांना प्रार्थना करते.

आ. ‘गुरुदेवांचे चरण किती सुंदर आणि मऊ आहेत !’, असे ती पुनःपुन्हा म्हणते. ती अनेक वेळा सांगते, ‘‘गुरुदेवांना मी एकटीने जाऊन भेटीन.’’

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या छायाचित्रात तिला तिच्या आईचे रूप दिसते.’

– श्री. रंजीत प्रसाद (कु. देवश्रीचे वडील), गया, बिहार. (२३.३.२०२४

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.