जयसिंगपूर(जिल्हा कोल्हापूर) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण, असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे राष्ट्रपतींच्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे, जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष श्री. महेश पोरे, शहर सचिव श्री. ऋषिकेश पाटील, स्वयंरोजगार विभाग शहर संघटक श्री. योगेश चव्हाण, उपसंघटक श्री. विजय साळुंखे, उपसंघटक श्री. सुमंत रत्नपारखे, मनसे महिला आघाडी शिरोळ शहराध्यक्षा प्रियांकाताई नाईक, उपशहराध्यक्षा जयश्रीताई पाटील, संभाजीपूर शाखाध्यक्ष महेश माने, शिरोळ शहराध्यक्ष रमेश शिंगाडे, हिंदु धर्म जागरण तालुकासंयोजक श्री. शुभम ताडे, ‘वीर सनातन मंडळा’चे श्री. प्रताप दाईंगडे, श्री. आदित्य दाईंगडे यांसह अन्य उपस्थित होते.