चारचाकी गाडीच्या अपघाताच्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांच्यामधील चैतन्याची आलेली प्रचीती !

‘२.५.२०२४ या दिवशी आम्ही (मी, सद्गुरु स्वाती खाडये आणि सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) ‘कोल्हापूर ते गडहिंग्लज’ असा चारचाकी गाडीने प्रवास करत होतो. मी गाडी चालवत होतो. दुपारी १२ वाजता आम्ही कोल्हापूर-बेंगळुरू महामार्गावर एका ठिकाणी गाडी मुख्य मार्गापासून बाजूला घेऊन थांबलो होतो. त्या वेळी दुचाकी गाडीवर बसलेल्या दोन व्यक्ती दुचाकी गाडीसह आम्ही बसलेल्या गाडीच्या मागच्या बाजूला जोरात येऊन धडकल्या. आमच्या चारचाकी गाडीची पुष्कळ हानी झाली. आमची काही चूक नसतांना ते दुचाकीस्वार आमच्याशी भांडू लागले.

सद्गुरू स्वाती खाड्ये

१. अपघातात आमच्या चारचाकी गाडीची पुष्कळ हानी झाली; मात्र सद्गुरु स्वाती खाडये यांच्या कृपेने कुणालाच काही झाले नाही. गुरुदेवांनी आम्हाला सद्गुरु स्वातीताईंच्या माध्यमातून वाचवले.

२. सद्गुरु स्वाती खाडये यांनी तत्परतेने साधकांना सांगणे

श्री. महेश चौधरी

सद्गुरु स्वातीताईंनी एका साधकाला भ्रमणभाष करून अपघाताविषयी सांगितले. तेव्हा ५ मिनिटांत एक धर्मप्रेमी आणि काही साधक आमच्या साहाय्यासाठी घटनास्थळी पोचले.

३. सद्गुरु स्वाती खाडये शांत आणि स्थिर असणे

आम्हाला दुचाकीस्वारांच्या माध्यमातून वाईट शक्ती त्रास देत होत्या; मात्र सद्गुरु स्वातीताईंमधील चैतन्यामुळे वाईट शक्तींचे काहीच चालले नाही. सद्गुरु स्वातीताई त्या प्रसंगात पुष्कळ शांत आणि स्थिर होत्या. मला नेहमी जशी भीती वाटते, तशी भीती या वेळी वाटली नाही.

४. ‘कठीण प्रसंगात करायच्या प्रार्थना आणि ठेवायचा शरणागतभाव अन् कृतज्ञताभाव’, यांविषयी लक्षात येणे

या प्रसंगी सद्गुरु स्वातीताई आम्हाला धीर देत होत्या. त्यांनी स्वतःच्या आचरणातून ‘कठीण प्रसंगाला सामोरे कसे जायचे ?’, हे आमच्या लक्षात आणून दिले. त्यांच्याकडून आम्हाला कठीण प्रसंगात ‘प्रार्थना कशा करायच्या, शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव कसा असावा ?’, हे शिकायला मिळाले, त्याबद्दल मी सद्गुरु स्वातीताईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. महेश चौधरी, अमरावती (३१.५.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक