Maldives Minister Arrested : राष्ट्राध्यक्ष मुईज्जू यांच्यावर काळी जादू केल्यावरून मालदीवच्या महिला पर्यावरणमंत्री फातिमा शमनाझ अली सलीम यांना अटक !

डावीकडून फातिमा शमनाझ अली सलीम आणि महंमद मुइज्जू

माले (मालदीव) – मालदीव पोलिसांनी त्यांच्याच देशाच्या पर्यावरणमंत्र्यांना अटक केली आहे. फातिमा शमनाझ अली सलीम असे त्यांचे नाव असून त्यांच्यासह अन्य २ जणांना अटक करण्यात आली आहे. फातिमा यांच्यावर राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे. फातिमा यांना या जादूचा वापर करून मुइज्जू यांना नियंत्रित करायचे होते.

मालदीवमधील दंड संहितेनुसार जादूटोणा हा फौजदारी गुन्हा नाही; परंतु इस्लामी कायद्यानुसार ६ महिने कारावासाची शिक्षा आहे. ‘द्वीपसमूहातील लोक पारंपरिक समारंभांमध्ये विविध प्रकारच्या जादू करतात, जे एखाद्याचा विश्‍वास जिंकू शकतात आणि त्यांच्या विरोधकांना शाप देतात’, असा त्यांचा विश्‍वास आहे.