धारवाड (कर्नाटक) येथे गोतस्करी रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून आक्रमण

  • आक्रमणानंतर हिंदु आणि मुसलमान युवकांमध्ये हाणामारी

  • बजरंग दलाकडून पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

संपादकीय भूमिका

धारवाड (कर्नाटक) – गायींची होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सोमशेखर या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर येथे हिंदू आणि मुसलमान तरुण यांच्यात हाणामारी झाली. यात काही जण घायाळ झाले. या आक्रमणाच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धारवाड उपनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले. ‘सोमशेखर यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना अटक करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी उपस्थित धारवाडचे आमदार अरविंद बेल्लद यांनी आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !