खासदार नीलेश लंके यांच्या स्वीय साहाय्यकावर अहिल्यानगरमध्ये आक्रमण !

नगर – येथील पारनेर भागात नगर दक्षिणचे विजयी खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांनी नीलेश लंके यांचे स्वीय साहाय्यक राहुल झावरे यांच्यावर आक्रमण केले. यामध्ये ते घायाळ झाले असून त्यांची गाडीही फोडण्यात आली आहे.