QS World Rankings : ‘क्यूएस् जागतिक रँकिंग २०२५’मध्ये आयआयटी मुंबई ११८ व्या स्थानी !

देशात आयआयटी मुंबई पहिल्या क्रमांकावर !

मुंबई – शैक्षणिक संस्थांच्या ‘क्यूएस् जागतिक रँकिंग २०२५’मध्ये मुंबई आयआयटी शिक्षण संस्था ११८ व्या स्थानी आहे. यासह बेंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स २११ व्या स्थानी, आयआयटी मद्रास २२७ व्या स्थानी, आयआयटी कानपूर २६३ व्या स्थानी, तर देहली विद्यापीठ ३२८ व्या स्थानी आहे.

देशात आयआयटी मुंबई पहिल्या क्रमांकावर, तर देहली विद्यापीठ दुसर्‍या क्रमांकावर आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, रोजगार परिणाम, आणि आंतरराष्ट्रीय संशोधन, हे या मूल्यांकनाचे निकष असतात.

मुंबई आयआयटी शिक्षण संस्था

महाराष्ट्रातील ४ शिक्षण संस्थांचा समावेश !

‘क्यूएस् जागतिक रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील ४ शिक्षण संस्थांचा पहिल्या हजार संस्थांमध्ये समावेश आहे. यामध्ये आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांचा समावेश आहे.